भांडारकर संस्थेवर महिलांचे राज्य
- म. टा. प्रतिनिधी
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदी डॉ. सरोजा भाटे निवडून आल्या असून त्यांच्यासह एकंदर आठ महिलांना कार्यकारिणीवर स्थान मिळाले आहे. त्यामध्ये नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या लीना मेहेंदळे आणि संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. लीला अर्जुनवाडकर यांचा समावेश आहे.
संस्थेचे मावळते मानद सचिव डॉ. मो. गो. धडफळे यांना १०, तर भाटे यांना १३ मते मिळाली. संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मेहेंदळे यांना १३; तर त्यांचे प्रतिस्पधीर् डॉ. दीपक टिळक यांना १० मते पडली. राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मेहंंेदळे यांची निवड प्रथमच होत आहे.
याशिवाय संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या पाच जागांवर डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. शोभना गोखले, प्रा. कल्याणी नामजोशी यांच्यासह डॉ. शि. द. शिंदे, डॉ. प्रमोद लाळे यांची निवड झाली. भांडारकरवर 'रमाराज्य' निर्माण झाल्याची गमतीदार प्रतिक्रिया संस्थेचे माजी कोषाध्यक्ष आणि नियामक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ. वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केली. महिलांचे प्रमाण वाढल्यामुळे संस्थेतील थांबलेली कामे मागीर् लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या विश्वस्तपदी भगवानराव देशमुख तसेच डॉ. म. के. ढवळीकर यांच्याही बिनविरोध नेमणुका पुन्हा एकदा झाल्या. कोषाध्यक्षपदी डॉ. गो. त्र्यं. पानसे यांची निवड झाली, तर संस्थेच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट सदानंद उर्फ नंदू फडके यांची निवड झाली.
Saturday, December 25, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment