समय निकालें भारतीय भाषाओं के लिये
कृष्णने गोवर्धन उठाया तो गोप-गोपियोंने लाठीका टेक दिया - रामने सेतू बाँधा तो गिलहरीने हाथ बँटाया। आप भी हिंदी व भारतीय भाषाओंके लिये योगदान दें। इन्स्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट सीखें। यह कक्षा पहली के पाठानुरूप (अआइई, कखगघचछजझ...) चलता है और उतनाही सरल है। फिर आप आटवीं फेल, अंग्रेजी न जाननेवाले बच्चोंको भी पाँच मिनटमें संगणक-टंकन सिखाकर उनकी दुआएँ बटोरिये।

Saturday, December 25, 2010

अनीस अहमद यांची केस सोनिया दरबारी

3 Apr, 2007, 1641 hrs IST
दिनेश कानजी

दुग्धविकास विभागाचे मंत्री अनीस अहमद आणि प्रधान सचिव यांच्यातल्या हेवेदाव्यांची परंपरा कायम आहे. उत्तम खोब्रागडे यांच्यानंतर आता दुग्धविकास खात्याच्या प्रधान सचिव पदी आलेल्या लीना मेहेंदळे यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. विभागातल्या अधिकाऱ्यांशी अनीस अहमद यांचे वर्तन अत्यंत असभ्यपणाचे असून त्यांची भाषा अत्यंत शिवराळ असते, अशा आशयाची तक्रार यापूवीर्च राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे. परंतु इथे हा विषय थांबेल अशी अजिबात शक्यता नसून हे प्रकरण आता थेट सोनिया दरबारी जाणार अशी चिन्हं आहेत.

उत्तम खोब्रागडे दुग्धविकास खात्याच्या प्रधान सचिवपदी असताना मंत्री अनिस अहमद यांच्याशी त्यांचे संबंध विकोपाला गेले होते. अनिस अहमद यांनी खोब्रागडे आपले आदेश ऐकत नाहीत, अशी तक्रार थेट प्रधान सचिवांपर्यंत केली होती. दुग्धविकास विभागाच्या प्रधान सचिवपदावरून खोब्रागडे यांची बदली होईपर्यंत हा वाद कायम होता. त्यांच्या जागी लीना मेहेंदळे यांची नियक्ती झाल्यानंतर हा प्रकार थांबेल, अशी शक्यता वाटत होती. परंतु पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होऊ लागली.

नियमात न बसणारी कामं करण्यासाठी अनिस अहमद दबाव आणतात आणि ती काम ऐकली नाही, की अधिकाऱ्यांशी अत्यंत शिवराळ भाषेत बोलतात अशा तक्रारी त्यांच्याबद्दल होऊ लागल्या. महिला अधिकारी या प्रकारामुळे जास्त हादरल्या आहेत. याबाबत राज्यपाल एस.एम. कृष्णा आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या. पण यानंतरही अहमद यांच्या वर्तनात काडीचाही फरक पडला नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय आता दुग्धविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनिस अहमद यांनी आपली वर्तणूक न सुधारल्यास त्यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीत असलेल्या लीना मेहेंदळे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, की दुग्धविकास विभागच्या मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक ही गंभीर बाब आहे. हा विषय धसास लावण्यासाठी जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत जाण्याची आमची तयारी आहे.

याप्रकरणी अनिस अहमद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

No comments: