स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन सेमिनार
19 Jun 2010, 0336 hrs IST
'मटा' आणि 'वेध अकॅडमी'चा पुढाकार
म. टा. प्रतिनिधी
सरकारी नोकऱ्यांना नाके मुरडण्याचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळवून मानाची सरकारी नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. या परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या सेमिनारचे आयोजन 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'वेध आयएएस अॅकेडमी'ने केले आहे. रविवार, २० जून रोजी ठाण्यातल्या थोरले बाजीराव पेशवे सभागृह, जोशी-बेडेकर कॉलेज, ठाणे (प.) येथे दुपारी ३ वाजता हा सेमिनार होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहेंदळे (आयएएस), इन्कम टॅक्सचे असिस्टण्ट कमिशनर मारुती मड्डेवाड (आयआरएस) आणि इन्कम टॅक्सचे असिस्टण्ट कमिशनर अभिषेक मेश्राम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, त्याचबरोबर आपले स्पर्धा परीक्षेचे अनुभवही सांगतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२११७४१००, ९८७०७७४१००, ९८२०६७३१४७.
Saturday, December 25, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment